Pune Mundhwa land Case 
पुणे

Pune Mundhwa land Case : मुद्रांक शुल्क विभागाने पाठवलेली 21 कोटींची नोटीस अमेडिया कंपनीकडून अमान्य

या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune Mundhwa land Case) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत.

यातच आता मुद्रांक शुल्क विभागाने पाठवलेली नोटीस अमेडिया कंपनीकडून अमान्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंढवा येथील सरकारी जागेची खरेदी करताना आयटी कंपन्याचे डेटा सेंटर उभारण्यासाठी घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे. असा अमेडिया कंपनीने वकिलांमार्फत दावा केला असल्याची माहिती मिळत आहे.

या संदर्भात नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने कंपनीला २१ कोटींची मुद्रांक शुल्क भरण्याची पाठविलेली नोटीस कंपनीने अमान्य केली असून लेखी म्हणणे सादर केल्यानंतर येत्या आठवडाभरात यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Summery

  • अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरायला नकार?

  • मुद्रांक शुल्क विभागाने पाठवलेली नोटीस कंपनीकडून अमान्य

  • लेखी म्हणणे सादर केल्यानंतर येत्या आठवडाभरात यावर सुनावणी होणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा