थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) सुनेत्रा पवार यांची उद्या पुण्यात बैठक असणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर उद्या पुण्यात ही बैठक पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.
यात 2026- 27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होणार आहे.
असून जानेवारीत अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागाकडून विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरू होते.
Summary
सुनेत्रा पवार यांची उद्या पुण्यात बैठक
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर पुण्यात
नवीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक