Pune Mayor 
पुणे

Pune Mayor : पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही; महापौर पदाची निवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम

पुण्याच्या महापौर, उपमहापौरपदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune Mayor) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता पुण्याच्या महापौर, उपमहापौरपदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. पुण्याचे महापौर, उपमहापौर आज ठरणार असून पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

महापौर पदाची निवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम असून काँग्रेस महापौर पदासाठी भरलेला अर्ज मागे घेणार नाही आहे. काँग्रेसकडून अश्विनी डॅनियल लांडगे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांनी अर्ज भरला आहे.

तर भाजपकडून महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे यांच्या नावाची चर्चा रंगली असून उपमहापौरपद आरपीआयचे परशुराम वाडेकर यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या या पु्ण्याच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही

  • महापौर पदाची निवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम

  • काँग्रेस महापौर पदासाठी भरलेला अर्ज मागे घेणार नाही

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा