थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील तळजाई परिसरात 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून काल मध्यरात्री 4 जणांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली.
तोडफोड करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून टोळक्यांच्या जुन्या भांडणातून ही तोडफोड झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
Summary
पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड
तळजाई परिसरात 25 ते 30 गाड्यांची तोडफोड
सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना