थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला इशारा दिला आहे. थकबाकी न भरल्यास पुण्याचे पाणी बंद करणार असल्याचा इशारा जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला दिला आहे.
पुणे शहरासाठी जलसंपदा विभागाने 11.60 टीएमसी पाणीकोटा मंजूर केला असून करारानुसार हा कोटा येत्या 15 दिवसात संपणार आहे. महापालिकेने तातडीने 933 कोटी रूपयांची थकबाकी भरावी अन्यथा करारानुसार पाणी कोटा संपत आल्यामुळे पुरवठा तात्काळ खंडित करावा लागेल.
असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. त्यामुळे महापालिका याबाबत काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
थकबाकी न भरल्यास पुण्याचे पाणी बंद
जलसंपदाचा पुणे महापालिकेला इशारा
पुणे शहरासाठी जलसंपदा विभागाने 11.60 टीएमसी पाणीकोटा मंजूर केला