मुंबई

Mumbai Crime : मालाडमध्ये धक्का! चिमुकलीवर हल्ला, सोन्याची लॉकेट चोरली!

मुंबईतील मालाड पूर्व भागात एक भयावह घटना समोर आली आहे. कुरार व्हिलेजमधील क्रांतीनगर परिसरात शाळेला निघालेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर एका तरुणाने हल्ला केला.

Published by : Riddhi Vanne

मुंबईतील मालाड पूर्व भागात एक भयावह घटना समोर आली आहे. कुरार व्हिलेजमधील क्रांतीनगर परिसरात शाळेला निघालेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर एका तरुणाने हल्ला केला. तिच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात त्याने चाकूचा वापर केला. मुलीने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या हाताचे बोट जखमी केले. या घटनेमुळे परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कुरार पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून 16 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, व्यसनासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने यापूर्वीही अशा घटना केल्या आहेत का, याची चौकशी सुरू आहे.

थोडक्यात

  • मालाड पूर्व, कुरार व्हिलेजमधील क्रांतीनगर परिसर.

  • शाळेला निघालेल्या सहा वर्षांच्या मुलीवर भयानक हल्ला.

  • आरोपीने मुलीचा सोन्याचा लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न करत चाकूचा वापर केला.

  • मुलीने प्रतिकार केला असता तिच्या हाताचे बोट जखमी झाले.

  • परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

  • भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा