मुंबई

Mantralaya : मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBची कारवाई; लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेरंगेला अटक

मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBने कारवाई केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Mantralaya ) मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBने कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे.

एका मेडिकल स्टोअरचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी लिपिकाने आधी 50000 रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर 35000 रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लाच आरोपीला पकडण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मंत्रालयातील एफडीए विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीत येतो. या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Summary

  • मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBची कारवाई

  • लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेरंगेला अटक

  • मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी मागितली लाच

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा