थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai ) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना होता होता टळली. मुंबई एअरपोर्टवर धावपट्टीवरच विमानांची टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले.
एअर इंडियाचे विमान मुंबईहून कोईम्बतूरला जाण्यासाठी पुशबॅक घेत होते. त्याच वेळी, हैदराबादवरून आलेले इंडिगोचे विमान लँडिंगनंतर पार्किंगच्या दिशेने सरकत होते याच दरम्यान या दोन विमानांच्या पंख्यांची जोरदार टक्कर झाली.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने आणि क्रू मेंबर्सनी लगेच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. काही वेळ प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या घटनेत कोणाला कोणतीही दुखापत झाली नसून प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना
धावपट्टीवरच विमानांची टक्कर
एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले