थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Pollution) मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळण्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील भागांमध्ये प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतो आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे.
त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वायुप्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.
शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक वाईट श्रेणीत नोंदवली गेली असून आज AQI 141 वर पोहचल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली
शहराचा सरासरी AQI पुन्हा 141 वर
अनेक भागांमध्ये पसरली धुक्याची चादर