थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Coastal Road ) भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत झाला असून कोस्टल रोडवरून गाडी जाताच आता ‘जय हो’ ची धून ऐकायला येतेय. देशातील या पहिल्या मेलडी रोडचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी दरम्यान पहिल्या मार्गिकेतील सुमारे 700 मीटर रस्त्यावर वाहनचालकांना या मेलडी रोडचा अनुभव घेता येत असल्याची माहिती मिळत आहे. यातच आता या मुंबई कोस्टल रोडवरील संगीत संकल्पनेला ब्रीच कँडी रहिवाशांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे.
ब्रिच कॅन्डी रहिवाशांचा या संगीत रोडला विरोध असून या संगीतामुळे त्रास होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. रहिवाश्यांच्या संघटनांनी मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून कोस्टल रोड परिसरातील वरिष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या संगीतामुळे अपघाताचा धोका वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Summary
मुंबई कोस्टल रोडवरील संगीत प्रयोगाला विरोध
ब्रिच कॅन्डी रहिवाशांचा संगीत रोडला विरोध
संगीतामुळे त्रास होत असल्याचा दावा