थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Wilson Gymkhana) विल्सन जिमखान्यासाठी आज गिरगावकर मोर्चा काढणार आहेत. विल्सन जिमखान्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच ती जागा जैन संस्थेला देण्यात आली. याविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर विल्सन जिमखान्याची जागा परत मिळवण्यासाठी आज ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात विराट मोर्चा काढला जाणार आहे. जिमखान्याच्या मैदानावर स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मज्जाव केला जात आहे, असा आरोप ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेकडून करण्यात आला आहे.
या मोर्चात गिरगावकरांसह मुंबईकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Summary
विल्सन जिमखान्यासाठी आज गिरगावकरांचा मोर्चा
जिमखान्याचा वाद प्रलंबित असतानाच जागा जैन संस्थेला
‘आम्ही गिरगावकर’ संस्थेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मोर्चा