Mumbai Local Mega Block  
मुंबई

Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Local Mega Block ) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज सर्व मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन जलद/सेमी-जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

सकाळी 10:28 ते दुपारी 3:40 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या येणार आहेत.

हा ब्लॉक सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 पर्यंत असणार आहे. यासोबतच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल पर्यंतच्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10:34 ते दुपारी 3:36 पर्यंत रद्द राहतील आणि पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी पर्यंतच्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10:17 ते दुपारी 3:47 पर्यंत रद्द राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा