थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(MHADA home lottery) मुंबईत हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. मार्चमध्ये म्हाडाची तीन हजार घरांची लॉटरी निघणार असून कोकण मंडळाच्या 4 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे तीन हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. ही लॉटरी मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
या कालावधीत म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे.दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
Summary
मुंबईत हक्काचं घर घ्यायची सुवर्णसंधी
मार्चमध्ये म्हाडाची तीन हजार घरांची लॉटरी
कोकण मंडळाच्या 4 हजार घरांची लॉटरी काढणार