Mumbai Air Pollution  
मुंबई

Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेचा स्तर खालावला; प्रदूषणाची समस्या 'जैसे थे'

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळण्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Pollution) मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळण्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील भागांमध्ये प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतो आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे.

मुंबईतील प्रदूषणाची समस्या 'जैसे थे' असल्याचे पाहायला मिळत असून यासोबतच थंडी कमी झाली असून उकाडा वाढला आहे. त्यामुळे उकाडा आणि प्रदूषणामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

रविवारी शहराच्या अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक AQI 175 वर पोहचल्याचे पाहायला मिळाले. तर तापमानाने 35 अंशांची उच्चांकी पातळी गाठली.

Summary

  • प्रदूषणाला उकाड्याचा तडका!

  • मुंबईतील प्रदूषणाची समस्या 'जैसे थे'

  • तर तापमानाने गाठली 35 अंशांची उच्चांकी पातळी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा