Mumbai 
मुंबई

Mumbai : मुंबई पालिकेत हालचालींना वेग; स्थायी समिती, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक

मुंबई महापालिकेत हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai) मुंबई महापालिकेत हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते अर्थसंकल्प आणि विशेष समित्यांच्या निवडीपर्यंतचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्थायी समिती, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार असून स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 16 फेब्रुवारीला समित्यांचे विषय पटलावर ठेवले जाणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षांची निवड होणार आहे.

24 फेब्रुवारीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली आणि दुखवटा प्रस्ताव मांडण्यात येणार असून हा दिवस शोकप्रस्तावासाठी राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. स्वीकृत सदस्यही याच दिवशी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • मुंबई पालिकेत हालचालींना वेग

  • स्थायी समिती, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक

  • 20 फेब्रुवारीला पार पडणार निवडणूक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा