Mumbai Mahapalika 
मुंबई

Mumbai Mahapalika : मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे? आज होणार निर्णय

स्थायी समिती तसेच सुधार, बेस्ट आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज आज दाखल करण्यात येणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Mahapalika) स्थायी समिती तसेच सुधार, बेस्ट आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज आज दाखल करण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे.

भाजप-शिंदेसेना युतीत स्थायी आणि शिक्षण समितीचे अध्यक्षपद भाजपकडे, तर बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिंदेच्या सेनेकडे देण्यात येणार असल्याचे माहिती मिळत आहे. परंतु सुधार समितीच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळत आहे. याचे अध्यक्षपद कोणाला मिळणार तसेच मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर आता या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Summary

  • स्थायी समिती तसेच सुधार, बेस्ट आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार

  • 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे

  • मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार? याकडे लक्ष

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा