थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 2.15 वाजता मुंबईत येणार आहेत.
त्यानंतर, दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात लोकभवन येथे द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्यानंतर, दुपारी 5 वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रोन यांची हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
'गेट वे ऑफ इंडिया' परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या मोदी-मॅक्रॉन भेटीमुळे भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यात बैठक
दुपारी 2.30 वाजता बैठक पार पडणार