Ritu Tawde 
मुंबई

Ritu Tawde : रितू तावडे आज महापौरपदी विराजमान होणार; तब्बल 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर

महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर लक्ष लागले होते ते म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार?

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ritu Tawde)महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर लक्ष लागले होते ते म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार? महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. त्यानंतर मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांचे नाव निश्चित करण्यात आले.

तर उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज रितू तावडे महापौरपदी विराजमान होणार आहेत. आज दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आले असून शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे नगरसेवक जल्लोष करणार आहेत.

यासोबतच समिती सदस्यांची नियुक्तीही आजच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत रितू तावडे महापौर म्हणून विराजमान होतील. तब्बल ४४ वर्षांनंतर पालिकेच्या महापौर पदी भाजपचा महापौर बसणार आहे.

Summary

  • रितू तावडे आज महापौरपदी विराजमान होणार

  • आज दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन

  • तब्बल 44 वर्षांनंतर भाजपाचा महापौर

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा