थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Virar) विरारमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विरारमधील फळ विक्रेता फळांवर गटारातील पाण्याचा शिडकाव करत असल्याचे समोर आले आहे. चक्क गटारातील पाणी फळांवर टाकून ते विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळत असून एका जागरूक नागरिकाने हा प्रकार समोर आणला आहे.
विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावर तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. विरारमधील एका जागरूक नागरिकाने याचा व्हिडिओ काढला असल्याची माहिती मिळत आहे. विश्वनाथ शेट्टी असे त्यांचे नाव असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यांनी याबाबत 112 वर कॉल करून याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर फुड अँड ड्रग्स यांना ही कळविले मात्र त्यांच्याकडून कार्यवाही करण्यास उडवाउडवीची उत्तर मिळाल्याचे त्या नागरिकाने सांगितले.
Summary
विरारमधील धक्कादायक व्हिडिओ समोर
रस्त्यावर फळविक्रेत्याकडून फळांवर गटारातील पाण्याचा शिडकाव
जागरुक नागरिकाने दिली फुड अँड ड्रग्स अधिकाऱ्यांना माहिती