राजकारण

मोठी बातमी! अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस

किरीट सोमय्या यांचा अस्लम शेख यांच्यावर १,००० कोटी रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

Published by : Team Lokshahi

मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे. यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर १,००० कोटी रुपयांचा मढ मार्वे स्टुडिओ घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महानगरपालिकेला या प्रकरणी ताबोडतोब कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचीही माहिती दिली.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हणाले की, असलम शेख यांना मढ मार्वे 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अस्लम शेख यांनी 4 ते 5 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीचं नेमकं कारणही स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे शेख यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा