राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी फोन करून आस्थेने विचारपूस केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांची तब्येत जाणून घेतली.
सोमवारी तब्येत बिघडल्याने शरद पवार यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी काळजीचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. खोकल्यावर औषधोपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेलही सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात उपचाराखाली
सोमवारी प्रकृती बिघडल्याने बारामतीहून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
तपासणीनंतर डॉक्टरांनी काळजीचे कारण नसल्याचं स्पष्ट केलं.
सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर
उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.