राजकारण

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! बार्टीअंतर्गत पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विद्यार्थ्यांची सकारात्मक बैठक पार पडली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे म्हणजेच बार्टीकडून देण्यात येणारी फेलोशिप मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विद्यार्थ्यांची सकारात्मक बैठक पार पडली. या चर्चेनंतर फेलोशिपची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे,

बार्टीचे विद्यार्थी गेले काही दिवस आंदोलनाला बसले होते. त्यांची मागणी होती की जे पात्र आहेत त्यांना सवलत आहे ती मिळाली पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे कोणावर अन्याय होणार नाही. 861 जणांना फेलोशिप मिळणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

मी काल जिथे गेलो तिथे ठिकठिकाणी घर जमीनदोस्त झाली होती तेव्हा मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तात्काळ काम झालं पाहिजे. त्यांनी सूचनेप्रमाणे काम केले आहे. ज्या अधिकाऱ्यांनी काम केले त्यांचे अभिनंदन करतो. मी स्वतः नुकसान झालं तिकडे पाहणी करतोय. मोठं नुकसान अवकाळीमुळे झालं आहे. योग्य निर्णय घेतले जातील कोणावर अन्याय होऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, बार्टी या संस्थेद्वारे पीएडी आणि एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. २०१३ पासून सुरु असलेली फेलोशिप सरकारने थांबविल्यामुळे विद्यार्थी तसेच बहुजन समाजात संतापाचे वातावरण होते. या विरोधात संशोधक विद्यार्थी ५० दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा