Rohit Pawar  
राजकारण

Rohit Pawar : विमान अपघाताच्या मागे गुप्त माहितीचा खेळ? रोहित पवारांचा सवाल

रोहित पवार यांनी हा प्रकार साधा अपघात नसून संशयास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी काही सोशल मीडियावरील पोस्ट्सचा दाखला देत, दुर्घटनेपूर्वीच काही लोकांना माहिती होती का.

Published by : Riddhi Vanne

रोहित पवार यांनी हा प्रकार साधा अपघात नसून संशयास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी काही सोशल मीडियावरील पोस्ट्सचा दाखला देत, दुर्घटनेपूर्वीच काही लोकांना माहिती होती का, असा सवाल उपस्थित केला. काही ट्रोल अकाउंट्सवरून आधीच सूचक संदेश टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय, विमान प्रवासासंबंधित गोपनीय माहिती बाहेर कशी जाते, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रवाशांची माहिती बाहेर लीक होत असल्यास त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. पायलटच्या वैयक्तिक परिस्थितीचाही त्यांनी उल्लेख करत, सर्व बाजूंनी निष्पक्ष तपास व्हावा असे सांगितले. “ही केवळ राजकीय बाब नाही,

आमच्या कुटुंबासाठी मोठा धक्का आहे,” असे भावनिक शब्दांत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा