लोकशाही स्पेशल

आज काय घडले : फ्रेंच राज्य क्रांतीतील शेवटच्या राजास अटक

Published by : Team Lokshahi

सुविचार

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात

  • १५१९ मध्ये पोर्तुगीज खलाशी फर्डिनांड मेजेलन पाच जहाजे घेऊन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाले. १५१९ ते १५२२ दरम्यान पृथ्वीची जलयात्रा सर्वप्रथम पूर्ण करण्याचे श्रेय मेजेलन यांना दिले जाते. ते स्वतः ही जगयात्रा पूर्ण करू शकले नाही. कारण २७ एप्रिल १५२१ रोजी फिलिपाईन्समधील सेबू ह्या प्रांतात आदिवासीसोबत झालेल्या चकमकीत ते ठार झाले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी पृथ्वी प्रदर्शना पुर्ण केली.

  • १७९२ मध्ये फ्रेंच राज्य क्रांतीतील शेवटचा राजा लुई सोळावा यांना अटक झाली. त्यानंतर फ्रान्समधील राजेशाही संपुष्टात आणली.

  • १९९९ मध्ये औषधांच्या दुकानांत विकल्या जाणाऱ्या औषधांत प्राणिजण्य पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

आज यांचा जन्म

  • नेस कॉफी, किटकँटचे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा १८१४ मध्ये जन्म झाला.

  • अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा १८५५ मध्ये जन्म झाला.

  • हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पहिल्या आधुनिक ग्रंथाचे लिखाण करणारे भारतीय संगीत शास्त्रज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा १८६० मध्ये जन्म झाला.

  • भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा १८९४ मध्ये जन्म झाला.

  • भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीचे अध्यक्ष देवांग मेहता यांचा १९६२ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे १९५० मध्ये निधन झाले.

  • जनरल अरुणकुमार वैद्य यांचे १९८६ मध्ये पुण्यात निधन झाले. त्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवून सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवले होते. त्यानंतर जनरल वैद्य दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. अखेरी १० ऑगस्ट १९८६ त्यांच्यावर पुण्यात ८ गोळ्या झाडण्यात आल्या.

  • कीर्तिचक्र विजेते लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव पाटील तथा एस. पी. पी. थोरात यांचे १९९२ मध्ये निधन झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतीसेनेचे ते सेनापती होते.

  • पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदी, संस्कृत अभ्यासक, साहित्यिक इतिहासकार, निबंधकार आणि समालोचक बलदेव उपाध्याय यांचे १९९९ मध्ये निधन झाले.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...