लोकशाही स्पेशल

आज काय घडले : ऑलिम्पिक समितीची स्थापना

Published by : Team Lokshahi

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. दर ४ वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

सुविचार

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

आज काय घडले

  • १७५७ मध्ये प्लॅसी या ठिकाणी मुघल शासक सिराज उदौला व ब्रिटीश यांच्यांत युद्ध झाले. ब्रिटीशांच्या तीन हजार सैन्यांनी मोठ्या फितुरीने सिराज उदौला यांच्या ५० हजार सैन्यांचा पराभव केला.

  • १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. दर ४ वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

  • १९८५ मध्ये दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट झाला. त्यात ३२९ नागरिक ठार झाले होते.

आज यांचा जन्म

  • पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय गांधीवादी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते चंडीप्रसाद भट्ट यांचा १९३४ मध्ये जन्म झाला. त्यांना राष्ट्रीय एकात्मतासाठी इंदिरा गांधी पुरस्कार, गांधी पीस पुरस्कार मिळाला आहे.

  • अर्जुन पुरस्कार विजेता माजी सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक प्रदीप कुमार बॅनर्जी यांचा १९३६ मध्ये जन्म झाला.

  • मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील नाट्य व चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा १९४२ मध्ये जन्म झाला. ते दहा वर्षाचे असतांना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली.

आज यांची पुण्यतिथी

  • मराठा पेशवा साम्राज्याचे शासक बाजीराव यांचे पहिले चिरंजीव बालाजी बाजीराव पेशवे यांचे १७६१ मध्ये निधन झाले.

  • आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे १९३९ मध्ये निधन झाले. देशांत मॉन्टेसरी शिक्षण पद्धती आणण्याचे श्रेय त्यांना जाते.

  • भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे १९५३ मध्ये निधन झाले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते उद्योग व पुरवठा मंत्री होते.

  • इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे १९८० मध्ये विमान अपघातात निधन झाले. ते स्वत:च विमान चालवत असताना अपघात झाला.

  • बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे १९८२ मध्ये निधन झाले.

  • नाटककार, नाट्यसमीक्षक आणि पदरचनाकार वसंत शांताराम देसाई यांचे १९९४ मध्ये निधन झाले. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली.

  • मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेच्या प्रमुख सिस्टर निर्मला तथा निर्मला जोशी यांचे २०१५ मध्ये निधन झाले. १९९७मध्ये मदर तेरेसा यांच्याकडून या संस्थेचा पदभार घेतल्यावर सिस्टर निर्मला यांनी संस्थेचा प्रभाव १३४ देशांतून पसरविला.

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ