Admin
Admin
लोकशाही स्पेशल

Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी? पाहा पद्धत

Published by : Siddhi Naringrekar

चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपण नववर्ष आणि गुढी उभारुन साजरा करतो. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण आहे. सकाळी 6.29 ते 7. 39 हा गुढी उभारण्याचा मूहूर्त आहे. या मुहूर्तावरती कोणतीही चांगली खरेदी केली जाते. तसेच सोने खरेदी केले जाते. महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो.

गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केलेली असते. ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी.गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.

काठीला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळावी. काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, लावून त्यावर तांब्या ठेवावा. अंगणात रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.

काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी. गुढीला नैवेद्या दाखवून अगरबत्ती लावावी. संध्याकाळी हळद-कुंकू, फुले वाहून गुढी उतरवावी. अशा प्रकारे गुढीची पूजा केली जाते.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...