लोकशाही स्पेशल

International Women's Day 2023 : आज 'जागतिक महिला दिन'; वाचा 'या' दिनाचा इतिहास

Published by : Siddhi Naringrekar

'जागतिक महिला दिन' हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिला दिन का साजरा केला जातो आणि याचं महत्त्व काय ते समजून घेणं महत्वाचे आहे.

महिला दिनाचा इतिहास

महिला दिनाची सुरुवात एका चळवळीने झाली. वास्तविक १९०८ साली अमेरिकेत कामगार चळवळ झाली होती. या आंदोलनात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. त्या आपल्या हक्काच्या मागणीसाठी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरल्या होत्या. या आंदोलना दरम्यान नोकरदार महिलांची मागणी होती की कामाचे तास कमी करावेत आणि वेतन वाढवावे. यासोबतच महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली. मग कामगार महिला चळवळीचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचला, त्यानंतर एक वर्षानंतर १९०९ मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस पहिल्यांदा २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क शहरात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेची स्थापना ऑगस्ट १९१० मध्ये झाली. त्याच वेळी जर्मनीने ८ मार्च १९१४ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७७ मध्ये हा दिवस दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...