दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge

Dinvishesh 4 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 4 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: मंकीपॉक्स साथीचा उद्रेक - युनाइटेड किंग्डम मध्ये ह्या रोगाची सुरवात.

१९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.

१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

१९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.

१९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

१९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.

१९५९: पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.

१९१०: रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.

१९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.

१८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.

१७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.

आज यांचा जन्म

१९८४: मंजुरूल इस्लाम - बांगला देशचा क्रिकेटपटू (निधन: १६ मार्च २००७)

१९४५: एन. राम - ज्येष्ठ पत्रकार

१९४३: प्रसांत पटनाईक - भारतीय अर्थशास्त्रज्ञ

१९४२: सॅम पित्रोदा - विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार

१९४१: परिमल डे - भारतीय फुटबॉलपटू (निधन: १ फेब्रुवारी २०२३)

१९४०: रॉबिन कुक - इंग्लिश कादंबरीकार

१९३४: अरुण दाते - भावगीत गायक

१९२९: आँड्रे हेपबर्न - अँग्लो-डच अभिनेत्री (निधन: २० जानेवारी १९९३)

१९२९: बाबा कदम - गुप्तहेरकथालेखक (निधन: २० ऑक्टोबर २००९)

१९२८: होस्नी मुबारक - इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष

१९१८: तनाका काकुऐ - जपानचे पंतप्रधान (निधन: १६ डिसेंबर १९९३)

१८४७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन - लोकमान्य टिळकांचे मित्र आणि विख्यात वैद्य (निधन: २ फेब्रुवारी १९१७)

१८२५: थॉमस हक्सले - ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक (निधन: २९ जून १८९५)

१६६४: एलिसाबेथ थेरेस डी लॉरेन - फ्रेंच नोबल वुमन आणि एपिनॉयच्या राजकुमारी (निधन: ७ मार्च १७४८)

१६४९: छत्रसाल बुंदेला - बुंदेलखंडचे महाराजा (निधन: २० डिसेंबर १७३१)

१००८: ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी - पर्शियन सूफी संत

१००८: हेन्री - फ्रान्सचा राजा (निधन: ४ ऑगस्ट १०६०)

आज यांची पुण्यतिथी

२०१३: ख्रिश्चन डी दुवे - बेल्जियन सायटोलॉजिस्ट आणि बायोकेमिस्ट - नोबेल पारितोषिक (जन्म: २ ऑक्टोबर १९१७)

२००८: किशन महाराज - प्रख्यात तबलावादक (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)

१९९३: एन.जी. चंदावरकर - भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी (जन्म: २ डिसेंबर १८५५)

१९८०: जोसेफ टिटो - युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ७ मे १८९२)

१९८०: अनंत काणेकर - भारतीय साहित्यिक, कवी व पत्रकार - पद्मश्री (जन्म: २ डिसेंबर १९०५)

१९६८: आशुतोष मुखोपाध्याय - बंगाली साहित्यिक

१९३८: कानो जिगोरो - ज्युदोचे संस्थापक (जन्म: २८ ऑक्टोबर १८६०)

१९३८: कार्ल फॉन ओसिएत्स्की - जर्मन पत्रकार आणि कार्यकर्ते, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ३ ऑक्टोबर १८८९)

१८७९: मुथू कुमारस्वामी - श्रीलंकन वकील आणि राजकारणी (जन्म: २३ जानेवारी १८३४)

१८४९: ज्योतीन्द्रनाथ टागोर - बंगाली साहित्यिक आणि चित्रकार (जन्म: ४ मार्च १९२५)

१७९९: टिपू सुलतान - म्हैसूरचा सुलतान, म्हैसूरचा वाघ (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com