लोकशाही स्पेशल

Raj Kapoor Birthday: राज कपूर यांनी वयाच्या 24 व्या वर्षीच स्थापन केला होता स्वतःचा स्टूडिओ

Published by : Team Lokshahi

हिंदी चित्रपटसृष्टीचे शोमन राज कपूर यांची आज 99 वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. बॉलिवूडला त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्यांना जाऊन जवळपास 35 वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र अजुनही त्यांचे किस्से बॉलिवूडमध्ये चर्चिले जातात. तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि 11 फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त राज कपूर यांनी वयाच्या 10 व्या वर्षी ‘इन्कलाब’ या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले. चित्रपटसृष्टीतील या महान व्यक्तिमत्त्वाने वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी स्वत:चा ‘आर के स्टुडिओ’ स्थापन केला.

1947 मध्ये आलेल्या ‘नील कमल’ या चित्रपटात त्यांना मोठा ब्रेक मिळाला. ज्यामध्ये ते बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मधुबालासोबत मुख्य भूमिकेत होते. राज कपूर यांच्या फिल्मी दुनियेतील किस्से जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्सेही सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. त्यांनी चित्रपटसृष्टीवर जवळपास चार दशके राज्य केले आणि वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या अनेक कथा आजही सिनेप्रेमींच्या ओठावर आहेत. मग ते त्याचे नर्गिससोबतचे प्रेम असो किंवा जमिनीवर झोपण्याची त्याची सवय. नर्गिसला प्रेमपत्र पाठवण्याची त्यांची कहाणीही खूप प्रसिद्ध आहे. राज कपूरबद्दल असे म्हटले जाते की, त्यांना ब्रँडेड दारू पिणे आणि मित्रांना खाऊ घालणे खूप आवडायचे. त्याने स्वतःसाठी दारूचा एक ब्रँडही निवडला होता, जो ते लंडनमधून विकत घ्यायचे.

वयाच्या अकराव्या वर्षी वडील पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत ‘वाल्मिकी’ चित्रपटात त्यांनी काम केले. तसेच वयाच्या बाविसाव्या वर्षी ‘आग’ हा पहिला चित्रपट करून सिनेप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला उत्कृष्ट चित्रपट दिले. त्याचा ‘आवारा’, ‘श्री 420’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बरसात’, ‘जागते रहो’, ‘राम तेरी गंगा मैली’ आणि ‘बॉबी’ हे चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतात. राज कपूर यांनी पहिले काम वडिलांच्या स्टुडिओत केले. त्याच्या सांगण्यावरून, त्यांच्या वडिलांनी त्यांना महिन्याला 1 रुपयावर कामावर ठेवले.

राज कपूर यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते कधीही बेडवर झोपले नाहीत. त्यांना जमिनीवर झोपणे आवडायचे. हॉटेलमध्ये राहूनही ते जमिनीवर झोपायचे. लंडनमधील प्रसिद्ध हिल्टन हॉटेलमध्ये जेव्हा ते जमिनीवर झोपायला जात होते, तेव्हा त्यांना हॉटेल व्यवस्थापकांनी ताकीद दिली होती आणि तसे न करण्यास सांगितले होते. हॉटेलने सांगूनही जेव्हा राज कपूर जमिनीवर झोपले तेव्हा त्यांना दंड ठोठावण्यात आला. या सवयीमुळे ते पाच दिवस दंड भरत राहिले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...