Admin
Admin
लोकशाही स्पेशल

Mahashivratri 2023 : महाशिवरात्री हा सण का साजरा केला जातो?

Published by : Siddhi Naringrekar

माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सगळीकडे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. भाविक शंकराच्या मंदीरात दर्शन घेण्यासाठी जातात.

महाशिवरात्रीच्या सणाचे महत्त्व आहे कारण ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे. या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात.समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता.

जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.

Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार १० टक्के सवलत

Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार, म्हणाले...

Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून मलाही मुख्यमंत्री पदाची ऑफर