Covid-19 updates

“लस घ्या आणि मिळवा पेट्रोल मोफत” अनोख्या जाहीरातीमुळे लांबच लांब रांगा

Published by : Lokshahi News

देशात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या चोविस तासात ६२,५०० नविन रुग्णांची नोंद झाली आहे तर ३००० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सरकारने १८ वर्षावरील प्रत्येकाला लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारकडून भरपूर खर्च करून जाहिरातही केली जाते मात्र नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवताना दिसतात. लसीकरणावरुन नागरीकांनमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहे.भारतात कोरोना सोबत पेट्रोलच्या किंमतीतही वाढ झालेली दिसते. या उद्देशाने नागरिकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करावे यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

काही ठिकाणी कोरोना लस घेतल्यावर भेटवस्तु दिल्या जातत पण झारखंडच्या राज्यात अशीच काहीसी घटना घडली आहे. झारखंडच्या चायबासा जिल्ह्यातील चक्रधरपूर गावात लसीकरणानंतर १ लीटर पेट्रोल मोफत अशी ऑफर नागरिकांना देण्यात आली आहे.लसी बद्दल असलेला गैरसमज आणि भीती घालवण्यासाठी अशा प्रकारे जनजागृती करण्यात येते.महिला व बालविकास आणि सामाजिक सुरक्षामंत्री जोबा मांझी यांनी सिंघभूमच्या प्रशासकिय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत या लसीकरण मोहीमेच उद्धाटन झालं.कोरोना विरोधातली लस सर्वांनी घेतली पाहीजे कोणीही अफवांनवर विश्वास ठेवु नये असेही मंत्री महोदयांकडून सांगण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा