M S Dhoni  
IPL T20 2021

कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे शेवटचे वाक्य; अश्रू दाटून आलेला व्हीडिओ व्हायरल…

Published by : Vikrant Shinde

The final words of MS Dhoni the captain: इंडियन प्रीमियर लीग च्या पंधराव्या परवाच्या आधी महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स( Chennai super kings) या टीमचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या ऐवजी चेन्नई सुपर किंग्स या संघाचा कर्णधार रवींद्र जडेजा असणार आहे. धोनीच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तरी संघाच्या भवितव्याचा विचार करून त्याने हा निर्णय घेतला आहे. ४० वर्षीय धोनी (40 Years Old Dhoni) आणखी किती वर्षे खेळू शकेल याबाबत शंका आहे. त्यामुळे संघाच्या भविष्याचा (Future of Team) विचार करून त्याने हा निर्णय घेतला आहे. पण धोनीच्या या निर्णयानंतर त्याचे दोन व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील एका मध्ये त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कर्णधार म्हणून शेवटचे बोल त्याच्या चाहत्यांना प्रेरणा देत आहेत.
महेंद्र सिंह धोनीने चेन्नई सुपर किंग साठी २०४ सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. त्यामध्ये १२१ विजय मिळवले तर ८२ सामान्यांमध्ये हार मानावी लागली. त्याच्या विजयाची सरासरी ५९.६० पॉईंट आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स ने २०१०, २०११, २०१८ व २०२१,या वर्षी जेतेपद पटकावले. याशिवाय ०९ वेळा आयपीएल फायनल मध्ये हा संघ पोहोचलेला आहे. CSK च्या नावावर दोन चॅम्पियन्स लीगचे जेतेपद देखील आहे.

२०२० च्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी चा खेळ पाहून त्याने निवृत्ती घ्यावी अशी चर्चा रंगली होती. IPL इतिहासात प्रथमच CSK चा संघ गुणतालिकेत प्रवेश करू शकला नाही, व क्रमवारीत शेवटच्या स्थानी राहिला. आयपीएल २०२० च्या शेवटच्या सामन्यामध्ये धोनीला असा प्रश्न विचारण्यात आला होता, की पिवळ्या जर्सीतील हा तुझा शेवटचा सामना का? यावर उत्तर देताना 'डेफिनेटली नॉट' (Definitely Not) असे प्रत्युत्तर त्यांनी दिले होते. त्यानंतर आयपीएल २०२१ मध्ये जेतेपद पटकावून त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली होती.

आयपीएल २०२१ च्या जेतेपदाला नंतरची ही व्हिडिओ आहेत. त्यात एका प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये कॉमेंटेटर हर्षा भोगले म्हणाले होते की, 'CSK साठी तू एक लेगसी मागे सोडून जात आहेस, त्यांना ती पुढे न्यायची आहे' यावर त्याने अजूनही मी इथेच आहे, असे उत्तर दिले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."