corona mumbai

टास्क फोर्सची रविवारी ‘माझा डॉक्टर’ परिषद

Published by : Lokshahi News

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेक उपाययोजना करत आहे. कोरोना राज्य कृती दलाने त्याचाच एक भाग म्हणून ५ सप्टेंबरला 'माझा डॉक्टर' ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुखदेखील उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत कोरोना कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, लहान मुलांच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. मेहुल मेहता सहभागी होणार आहेत.

रविवारी सकाळी ११ ते १ या वेळेत होणारी परिषद समाजमाध्यमांवर प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फमिली डॉक्टर्स, तज्ञ आणि नागरिकसुद्धा या परिषदेत ऑनलाईन उपस्थित राहू शकतील. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी, अनेक शंका यावर चर्चा, तसेच माहिती देण्यात येणार आहे. https://www.facebook.com/onemedhealth या लिंकवर आपले प्रश्न पाठवता येणार आहेत.

या परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक