Vidhansabha Election

Maharashtra Vidhansabha Election : उद्यापासून विधानसभेचा रणसंग्राम सुरू होणार

उद्यापासून विधानसभेचा रणसंग्राम सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्यापासून सुरुवात होणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे.

Published by : Team Lokshahi

उद्यापासून विधानसभेचा रणसंग्राम सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्यापासून सुरुवात होणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे खरा रणसंग्राम उद्यापासून सुरु होणार आहे. काही दिवसांपुर्वींच 15 तारखेला निवडणुक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली गेली होती. त्यानंतर वाटाघाटींना वेग आला असला तरी देखील महायुती असेल किंवा मविआ असेल यांचा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला असतो.

तो फायनल फॉर्म्युला ठरलेला नाही आहे आणि आता उद्यापासून रणधुमाळी सुरु होणार आहे ती म्हणजे अर्ज भरण्याची त्यामुळे आता नोटीफिकोशन जारी झाल्यावर कोण कोण भरणार आहे हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. तर अशामध्ये भाजपची एक यादी जाहीर झालेली आहे. भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे.

त्याच्यामुळे पहिला ते उमेदवार पहिला उमेदवारी अर्ज भरतील. त्याचबरोबर मविआ असेल किंवा महायुती असेल त्यांच्या इतर पक्षाकडून कोण कोण उमेदवारी अर्ज भरणार आहे हे पाहण देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे उद्यापासून खरी निवडणुकीची धामधुम सुरु होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश