थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बैठका, प्रचार सर्व जोरात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपने चांगलीच कंबर कसली असून निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे.
याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली असून मोदी-फडणवीसांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा दावा करण्यात आला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निवड झाली असून नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत भाजपजी सेंच्युरी पाहायला मिळते आहे.
बिनविरोध जिंकलेले नगरसेवक - 100
बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष - 3
कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध?
- कोकण-4
- उत्तर महाराष्ट्र-49
- पश्चिम महाराष्ट्र-41
- मराठवाडा-3
- विदर्भ-3
Summery
नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत भाजपजी सेंच्युरी
निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती