महाराष्ट्र

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपुर्ण वेळापत्रक

Published by : Lokshahi News

कोरोना वैश्विक महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. त्यातच आता तिसरी लाट ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट यामुळे यंदाच्या वर्षी परीक्षा होणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता.मात्र या प्रश्नाच उत्तर शिक्षण विभागाने दिले आहे.

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे.यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक:

१५ मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
१६ मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा
१९ मार्च – इंग्रजी
२१ मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२२ मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा)
२४ मार्च – गणित भाग – १
२६ मार्च – गणित भाग २
२८ मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर १
४ एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर २

बारावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक :

४ मार्च – इंग्रजी
५ मार्च – हिंदी
७ मार्च – मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलुगू इ.
८ मार्च – संस्कृत
९ मार्च – वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
१० मार्च – भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र
११मार्च – चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
१२ मार्च – रसायनशास्त्र
१४ मार्च – गणित आणि संख्याशास्त्र
१५ मार्च – बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान
१६ मार्च – सहकार
१७ मार्च – जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास
१९ मार्च – भूशास्त्र, अर्थशास्त्र
२१ मार्च – वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म
२२ मार्च – अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य

iPhone17 मार्केटमध्ये लॉन्च ; जाणून घ्या 'ही' वैशिष्ट्य

Hollywood Star Robert Redford : मोठी बातमी! हॉलिवूडचा ‘गोल्डनबॉय’ रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन