महाराष्ट्र

Omicron Maharashtra | महाराष्ट्रात ११ ‘ओमायक्रॉन’ बाधितांची नोंद; ८२५ नवीन कोरोनाबाधित

Published by : Lokshahi News

राज्यात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ११ नवीन 'ओमायक्रॉन'बाधित आढळले. यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या ६५ वर पोहचली आहे. तर ८२५ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.

११ 'ओमायक्रॉन'बाधितांमध्ये ८ जण हे मुंबई विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान आढळले. तर, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. आजपर्यंत आढळून आलेल्या ६५ 'ओमायक्रॉन'बाधितांपैकी ३४ जणांची आरटीपीसआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

राज्यात ८२५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, ७९२ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, १४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्याचा मृत्यू दर २.१२ टक्के आहे. तर, आजपर्यंत राज्यात ६४,९८,८०७ रूग्ण कोरोनामुक्त झालेले असून, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.७१ टक्के आहे.सद्यस्थितीस राज्यात ७३,०५३ जण गृह विलगिकरणात असून, ८६४ जण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे