महाराष्ट्र

Maharashtra: महाराष्ट्रात 11 नव्या कोरोनाव्हायरस रुग्णांची नोंद

मंगळवारी 19 डिसेंबरला महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Published by : Team Lokshahi

मंगळवारी 19 डिसेंबरला महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आलेआरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहे. होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण आहेत. एक रुग्ण रुग्णालयात अलगावमध्ये आहे, त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 प्रकारातील पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत कोविडच्या प्रकरणावर देखरेख ठेवण्यास सांगितले आहे.

‘जेएन.१’चे रुग्ण डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यातच ८ डिसेंबरला केरळमधील एका 79 वर्षीय महिलेला ‘जेएन१’ची लागण झाल्याचे आढळले होते. त्यानुषंगाने केंद्र सरकारने सर्व राज्यांना आरोग्य सेवा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेत सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ‘इन्फ्लूएंझा’सारखे आजार आणि तीव्र श्वसनसंदर्भातील आजार असलेल्या रुग्णांचे अधिक सक्षमपणे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्वेक्षणांमध्ये आढळलेल्या रुग्णांची करोना चाचणी करण्याचे निर्देशही दिले आहेत. 'जेएन.१'चा रुग्ण सापडल्याने राज्यामध्ये करोना पूर्वतयारी करण्यात येत असून 17 डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांमधील रुग्णालयांच्या सज्जतेची फेरतपासणी करण्यात आली.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात 5 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय पुण्यात 2 आणि कोल्हापुरात 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. मंगळवारी एकाही रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही आणि एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड