महाराष्ट्र

Maharashtra Corona । महाराष्ट्रात ११ हजार १२४ रुग्णांची कोरोनावर मात

Published by : Lokshahi News

राज्य सरकाने २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर आज दिवसभराती राज्यातील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक अशीच ठरली आहे. आज ११ हजार १२४ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा निर्णय आणि आकडेवारी दिलासादायक ठरली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ११ हजार १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६० लाख ७५ हजार ८८८ झाला आहे. यासोबतच राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९६.५९ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार २४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ६२ लाख ९० हजार १५६ इतका झाला आहे. त्यापैकी ७८ हजार ५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर गेल्या काही दिवसांमध्ये २.४ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आज दिवसभरात राज्यात १९० करोना मृत्यूची नोंद झाली असून आत्तापर्यंत राज्यात १ लाख ३२ हजार ३३५ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या