(11th Class Online Admission ) अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. नव्या निर्णयानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
वेब साईटवर इन हाऊस कोट्यातील शाळांमध्ये बदल करण्यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी म्हणून शिक्षण संचालनालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
11 वी ऑनलाईन प्रवेश प्रकियेला आता 5 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 6 मे 2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
11 वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी/ पालक यांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.