Crime Team Lokshahi
महाराष्ट्र

जुन्या वादातून अकरावीच्या विद्यार्थ्यांचा गळा चिरला, आरोपी ताब्यात

जुन्या वादातून चाकूने वार करून एकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

वाशिम : जिल्ह्यातील कारंजा शहरामधील विद्याभारती महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्याने जुन्या वादातून चाकूने वार करून एकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक विद्यार्थी गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हल्ला करणारा विद्यार्थी निखिल मेहरे याला पोलिसांच्या ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अल्पवयीन फिर्यादी व आरोपी निखिल मेहरे हे एकाच महाविद्यालयात शिकतात. फिर्यादी हे अकरावी विज्ञान शाखेचे तर आरोपी हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे. फिर्यादीचा मित्र बिलाल याकूब खान व मेहरे यांच्यात मागील ऑगस्ट महिन्यापासून विविध करणावरून वाद सुरू होता.

सकाळी नऊ वाजता फिर्यादी आणि त्यांच्यासोबत गुलाम दस्तगीर, बिलाल याकूब खान असे तिघेजण कॉलेजला जात असताना निखिल मेहेरे आणि त्याचे दोन अनोळखी मित्र यांनी बिलाल याकूब खान याला शिवीगाळ केली. बिलालने त्यांना शिविगाळ का करतो, असे विचारले. तर निखिल मेहरे याने त्याच्या खिशातून एक चाकू काढून बिलाल याकुब याला जीवे मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर मारला.

त्याला सोडवण्याकरिता फिर्यादी आणि त्याचे मित्र गेले असता निखिल मेहरे यांनी फिर्यादीचा मित्र याच्या मानेवर आणि फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर चाकूने मारहाण केली. त्याच्यासोबत असणारे यांनी सुद्धा लाथा बुक्क्याने मारहाण केली. शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. यावरून आरोपी निखिल मेहरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस आहे खास; जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar- आजचा सुविचार

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली