महाराष्ट्र

127 कोटींचा घोटाळा; सोमय्यांवर फौजदारी 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

Published by : Lokshahi News

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. या आरोपावर आता हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावत प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.

सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले.मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार आहे.

प्रकरण काय ?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केला आहे. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत", असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

"CRM Systems PVT LTD इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं लोन घेतल्याचं दाखवलंयय. या कंपनीवर २०१७-१८मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे", असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेतून 'या' बहिणींना वगळले, आता चेक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही?

Uttar Pradesh News : केसाची क्लिप आणि छोटा पॉकेट चाकू, रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसूती; नेमकं प्रकरण काय?

Shubman Gill : 'त्या' प्रकरणामुळे शुभमन गिल अडचणीत? BCCI कडून कारवाईची शक्यता

MNS Leader Video Viral : मनसे नेत्यांच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ