थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vasai ) वसईत शाळेतील विद्यार्थीनीला ती शाळेत उशिरा आल्याने तिला दप्तर खांद्यावर घेऊन 100 उठाबशा काढायची शिक्षा दिली होती. शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली.
त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता जे जे रुग्णालयात शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अखेर वालीव पोलिसांकडून शिक्षिका ममता यादव हिच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सदोष मनुष्यमवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.