भंडाऱ्यात 19 लहान मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व मुले 6 ते 12 वर्ष वयोगटातील आहेत. सर्व मुलांना मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शिवणी गावातील 19 लहान मुलांना विषबाधा झाली आहे. गावात मुले खेळत असताना या मुलांनी फळ समजून चंद्रज्योतीच्या झाडाच्या बिया खाल्ल्या होत्या. यानंतर सायंकाळ होताच मुलांना उलटी, मळमळ, होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. पण जवळ जवळ 19 मुलांना उलटी होऊ लागल्याने त्यांनी झाडाचे फळ खाल्ले असल्याचे सांगितले.त्यानंतर सर्व मुलांना मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून सद्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.