महाराष्ट्र

मित्रांसोबत मौजमस्ती बेतली जीवावर! एका तरुणाचा मृत्यू

मित्रांसोबत मौजमस्तीसाठी गेलेल्या तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाण्याजवळील पानखंडा गावात ही घटना घडली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

शुभम कोळी | ठाणे : मित्रांसोबत मौजमस्तीसाठी गेलेल्या तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाण्याजवळील पानखंडा गावात ही घटना घडली. चिराग जोशी असं या 19 वर्षीय तरुणाचं नाव असून तो कळव्यात राहणारा होता. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

बुधवारी संध्याकाळच्या सुमारास चिराग आपल्या काही मित्रांसोबत ओवळा पानखंडी गवाजवळ असणाऱ्या एका बंधाऱ्याच्या येथे गेला होता. पावसामुळे बंधाऱ्यामध्ये काठोकाठ पाणी भरले होते. मात्र, चिरागला पोहता येत नव्हते तरीही तो पाण्यामध्ये गेला. बराच वेळ तो बाहेर न आल्याचे मित्रांच्या लक्षात आल्याने चिरागची शोधाशोध सुरू झाली. अखेर रात्री उशिरा ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाने आणि अग्निशमन विभागाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्रीच्य़ा अंधारात शोधकार्य करणे शक्य नसल्याने कार्य थांबविण्यात आले होते.

आज सकाळी ८:३० वाजल्यापासून पुन्हा शोधमोहिम सुरू केली असता चिरागचा मृतदेह बंधाऱ्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. सदर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, चिरागला पोहता येत नव्हते तरी तो पाण्यात कसा गेला याबाबत मित्रांनाही कल्पना नसून याबाबत पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा