महाराष्ट्र

हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडले; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Published by : Lokshahi News

मंगेश जोशी | जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीत काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हातनूर धरणाचे आज सकाळी बारा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते. मात्र पूर्णा नदीतून हतनूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी सात वाजता हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे.हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 34785 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीत काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे