महाराष्ट्र

रत्नागिरीच्या मनोरुणालयात २० रुग्ण ‘कोरोना पॉझिटिव्ह’

Published by : Lokshahi News

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी होत असताना रत्नागिरी शहरातील मनोरुग्णालयात एकाच ठिकाणी 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या घटनेने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून प्रत्येक रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी प्रादेशिक मनोरुणालयातील तब्बल २० रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग पुन्हा एकदा चांगलाच अलर्ट झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संख्या आटोक्यात येत असताना या आठवड्यात रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयातील २० मनोरुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास सर्व रुग्णांचे पहिले लसीकरण पार पडले आहे. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

येथील महिला रुग्णालयात या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती मनोरुग्णालयाकडून देण्यात आली.कोरोना काळातही रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याचे काम सुरू होते आताही दररोज कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र दाखल करण्यापूर्वी त्यांचे आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिले जातात. मात्र आता कोरोनाची लागण नेमक कशी झाली असेल तर याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."