महाराष्ट्र

चंद्रपूरात बल्लारपूरात 22 किलो गांजा जप्त

Published by : Lokshahi News

चंद्रपूरातील बल्लारपूर शहरात पोलिसांनी 22 किलो गांजा जप्त केल्याची घटना समोर येत आहे. सायंकाळच्या दरम्यान सुभाष टॉकीज समोर पोलिसांनी एका इंडिका कार मधून 22 किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक करून स्पॉट वरच कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगाणा तुन इंडिका कार क्र, TS-02FD-6090 मधुन मोठी गांजा ची खेप येत असल्याची खात्री पूर्वक मिळाली त्या आधारे पोलिसांनी मुख्य मार्ग वर सापळा रचून सुभाष टॉकीज समोर कारला अडविले व कारची झडती घेतली असता त्यात 22 किलो गांजा जप्त करण्यात आला व तिथेच स्पॉट कारवाई करण्यात आली असता मुख्य मार्गावर ये जा करणाऱ्या लोकांची बघाव्याची गर्दी दिसून आली पहिल्यांदाच मोठया प्रमाणात गांजा पकडल्याची कारवाई स्पॉट वरच करण्यात आली आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे कारवाई नायब तहसिलदार कुलसंगे यांचा समक्ष करण्यांत आली यावेळी पोलीस स्टेशन चे सर्वच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा