महाराष्ट्र

वर्ध्यात मनसेला धक्का; प्रदेश उपाध्यक्षासह 28 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published by : Lokshahi News

भूपेश बारंगे, वर्धा | वर्ध्यात मनसेला मोठा झटका बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतूल वांदीले यांच्यासह 28 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

वर्ध्यातील हिंगणघाट येथील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतूल वांदीले राष्ट्रवादी पक्षात मुंबईतील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आज दुपारी 1वाजता प्रवेश झाला. राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश केला गेला. यावेळी अतूल वांदीले यांचे भाषण देखील झाले. यावेळी अतूल वांदिले यांच्या सोबत मनसेच्या प्रमुख 28 कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.यावेळी पक्षप्रमुख शरद पवार, राका प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री बनसोड, आमदार संदीप शीरसागर, माजी केंद्रीय मंत्री, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा