महाराष्ट्र

Maharashtra Corona | राज्यात ३ हजार ७४१ नवीन कोरोनाबाधित

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. कारण दररोज समोर येणारी नवीन बाधितांची संख्या कमी आढळून येत आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांचा आकडाही वाढतोय, त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे.

राज्यभरात आज ४ हजार ६९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून ३ हजार ७४१ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण ६२,६८,११२ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्के एवढे झाले आहे.आता राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६४,६०,६८० झाली आहे. आजपर्यंत राज्यात १३७२०९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं